![]() |
| Add caption |
माझा मोठा भाऊ नितीन कायम सांगत असे, की जे काही करशील ते संपूर्ण समर्पितपणे कर. माझ्या आयुष्यातील भेट मिळालेली पहिली बॅट माझी बहिण सविताने दिली होती. ती काश्मीर विलोची खास माझ्यासाठी आणली होती. माझा दुसरा भाऊ अजितबद्दल मी काय बोलू. त्याने त्याची कारकिर्द माझ्यासाठी घालविली. त्याच्याशी मी माझ्या फलंदाजीच्या शैलीबाबत कायम चर्चा करत असे आणि तो मला धडे देत असे. काल (शुक्रवारी) रात्रीसुद्धा त्याने माझ्या फलंदाजीविषयी माझ्याशी फोनवर चर्चा केली. 1991 मध्ये माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे अंजली माझ्या आयुष्यात आली.
अंजलीने मला पाठिंबा दिला आणि ती म्हणाली की तू क्रिकेट खेळ, मी कुटुंब संभाळते. त्यामुळे ती कायम माझ्यासोबत राहिली, ते मी कधीच विसरू शकत नाही. मी तिच्यासोबत आयुष्यातील खूप मोठी 'पार्टनरशिप' केली आहे. माझी दोन्ही मुले- सारा आणि अर्जुन यांनी मला खूप समजावून घेतले आहे. मी त्यांना कधीच वेळ देवू शकलो नाही. पण, आता इथून पुढचा वेळ त्यांच्यासाठीच असेल. कुटुंबाबरोबर असणे आणि कायम साथ देणे हे खूप महत्त्वाचे आहे.
माझ्या मित्रांचाही माझ्या कारकिर्दीत मोठा वाटा आहे. ती त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीला वळण लागले ते माझा भाऊ अजितने मला रमाकांत आचरेकर यांना भेटविले तेव्हा. मी त्यावेळी त्यांच्या स्कूटरवरून जाऊन वेगवेगळ्या मैदानांवर सामने खेळले. आचरेकर सरांनी मला खूप पाठिंबा दिला. मुंबई क्रिकेट संघटनेनेही मला खूप मदत केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही (बीसीसीआय) आभार.
गेल्या 24 वर्षांत मी अनेक वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळलो. राहुल, सौरभ, कुंबळे आणि लक्ष्मण यांच्याबरोबर अनेक सामने खेळलो आहोत. कुटुंबाबाहेर असताना हेच आमचे कुटुंब असायचे. धोनीने मला 200 व्या कसोटीची टोपी देताना मी त्यांना म्हटलो की, तुम्ही भारताचे प्रतिनिधत्व करत आहात. तेव्हा ते विश्वासाने आणि गर्वाने करत रहा. पूर्ण देशाचे तुमच्याकडे लक्ष आहे.
स्टेडियममधील प्रेक्षकांकडून देण्यात येत असलेली 'सचिन...सचिन' ही घोषणा माझ्या आयुष्यावर कानात गुंजत राहिल.
''सचिन ला आपल्या सर्वांतर्फे पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा''
![]() |
| Add caption |


No comments:
Post a Comment